ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:42:55 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

माझं काय जायतंय,,,
जळते सर्वाची मी कशाला धुर काढावा ?,,,,,,

काही दिवसांपूर्वी जो धूळ खात होता,
तोच आज एःसीत बिर्यानी खात आहे,!
हे सांगितले तर लोकांना ,,,,
म्हणतात तुला काय करायचंय,,,,

ह्या जातीधर्माने सालं माणूसपण नेलं,
बुध्दी थिंजवून माणसाला माकड केलं,!
हे सांगितले तर लोकांना ,,,,
म्हणतात तुला काय करायचंय,,,,

ते हे परवाशी ते हे रहिवासी सांगून तो,
आपलेच अर्धवट अंध विचार रेटतो,!
हे सांगितले तर लोकांना ,,,,
म्हणतात तुला काय करायचंय,,,,

गल्लीगल्ली पुतळे बांधून काय केले ?
विचार सोडून, महात्म्यांना जातीत नेले,,
हे सांगितले तर लोकांना ,,,,
म्हणतात तुला काय करायचंय,,,,

मनात काळे अन् बाहेर देशभक्ती वेश
अशात का? घंटा होईल महासत्ता देश,,,,,
हे सांगितले तर लोकांना ,,,,
म्हणतात तुला काय करायचंय,,,,

✍🏻ललित कुमार________________
13/09/2016 (3:21am)
wapp7744881103