ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:44:17 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,,

इथे इतिहासात बुवा बाबांचे चमत्कार झाले
त्याजागी वैज्ञानिक आविष्कार झाले असते
तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,,

इथे काल्पनिक कथा काव्य रचणारे झाले
त्याजागी वास्तव्य समजणारे झाले असते,
तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,,

इथे विश्वास कपाळ कातड्यात ठेवला गेला
तोच विश्वास ह्या मनगटावर ठेवला असता,
तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,,,

इथे भक्तीभक्ती करत सारी जिंदगी वाहिली
त्याजागी शक्ती बुद्धीसाठी वाहिली असती,
तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,

इथे कोस कोस नाम गजर चालवला गेला
त्याजागी पाऊल शोध दिशेला गेले असते,
तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,,

इथे जाती धर्मांनी माणूस आपसात तोडला
त्याजागी माणूस तो माणूस राहिला असता
तर,,,, आपण कुठल्या कुठे असतो,,,,,

✍🏻ललित कुमार ______________
10/09/2016 (1;26am)
___wapp7744881103 _____