चाहूल विरहाची....

Started by Gauri Sonone, November 21, 2016, 01:09:39 PM

Previous topic - Next topic

Gauri Sonone

अंधारल्या रात्री तुटलेले तारे कसे शोधावे ,
दुभंगलेल्या नात्याला पुन्हा कसे जोडावे........
परतून तु असा येशिल का कधी,
वळणावरी मी घेऊनी आस उभी........
का गुंतविला जीव वेडा दूर जाण्यासाठी,
तुझ्याविना अधुरी मी का अशी अभागी .......
सुन्या सुन्या जीवनी या प्रीतगंध भरलास,
भावनांचं मोल जाण कवडीमोल ठरवू नकोस.......
सुटला आधार ,तुटले नाते,अंधार हा पेटला,
धगधगत्या काळजात कल्लोळ हा माजला.........
या घायाळ मनाला पुन्हा घाव घालण्या येऊ नकोस,
डोळ्यांतील आसवांना लावण्या वणवा परतून येऊ नकोस.........
                                   - Gauरी....