देवा, तुला नक्की काय करायचं होतं ?

Started by abhishek panchal, November 21, 2016, 05:24:24 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

भल्यामोठया तंट्यातून , तू जन्म मला दिला
अगदी थोड्या क्षणात , तू पोरका याला केला
आधार देतो म्हणून , तू थोडा पुढे आला
पुढे येऊन माझा , आधारच घेऊन गेला

तेव्हाच माझ्या मनी , एक कोडं उभं होतं
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?

सुख म्हणून दिलस , ते झोळीत नाही पडलं
किती सांगू तुला , नेमकं काय काय घडलं
साठवण्या ते सुख , तू झोळी मला दिली
माझाच नशीब खोटं , ती ही फाटकी निघाली

सुख म्हणून नक्की , तुला काय द्यायचं होतं ?
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?

वाटलं होतं चालतोय ती वाट आहे न्यारी
अजून सुद्धा चालताना , ती काटेच फेकून मारी
होईल पुढे काही , अशी आशाच गायब झालीय
त्याच वाटेने माझी , हालत अशी केलीय

वाट म्हणून तुला , काय दाखवायचं होतं ?
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?

                                   - अभिषेक पांचाळ
                                   ( ९०२८८७५९५८ )