गंभीर कविता

Started by Prabhakar bhasme, November 21, 2016, 10:58:17 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

                 रणरागिनी
डोळ्यात आणू नको पाणी
तू तर योगिनी महाश्वेताग्नि
तू तर कारुण्याची मूर्ति प्रेमळ मूर्ति
तू श्वेताग्नि विश्वयोगिनी
टाक पाऊल होऊ दे  रणरागिनी

भ्याड मर्दांनो  तुमची सेवा केली आता पुरे
होईल रणरागिनी  करीन चिंधड्या एकेक कणाएवढी
प्रेम पाहिले आता पहा रणरागिनी श्वेताग्नि
कारुण्याच्या पदराआड आहे रणरागिनी द्वेषाग्नि

जगाची आई जनतेची माई पाहिले नाहीस का दुर्गादेवी
उग्ररुप अग्निरुप करीन खांडोळी क्षणात बाई
दिव्यत्वाची येईल प्रचिती जेव्हा होईल नामशेष प्रूथ्वी
भ्रम निराश होईल जेव्हा कारुण्याची मूर्ती होईल योगिनी

        स्वरचित काव्य    प्रभाकर भस्मे
                                 9757135696