विरह गीत

Started by Prabhakar bhasme, November 22, 2016, 12:03:32 AM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

                    पाऊल वाट
वळुन जाई एक पाऊल वाट
वाट पाहुन झाली पहाट
थरथरत्या ओठांना तुझीच ओढ
येणार घेणार जवळी एकदा मला

आठवणींची ओढ कधी संपणार
या ह्र्दयाचे त्या ह्र्दयाला कसे आठवणार
मनाचे पाखरु ओढ किती घेणार
येणार घेणार जवळी एकदा मला

चंद्र उगवला नभावरी
वारा सांगुन गेला चाहुल तुझी
भेट होणार या क्षणी मला
येणार घेणार जवळी एकदा मला

हातात हात सर्व अर्पिले तुला
तुझ्या आठवणींनी घायाळ केले मला
धूसर झाली वाट गेली सोडुन मला
येणार घेणार जवळी एकदा मला

          स्वरचित काव्य     प्रभाकर भस्मे
                                   9757135696

Aashishkumar