जर हो आला असता

Started by abhishek panchal, November 23, 2016, 10:20:17 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

स्वप्नांचा तो खेळ , सत्यात दिसला असता
जर नाही ऐवजी तुझा , हो आला असता

मंथरलेलं प्रेम , मला भूल देऊन गेलं
आयुष्य हे माझं , स्वप्न जणू झालं
राजा होतो मी , राणी तुला केलं
होतं नव्हतं मन , सारं तुला दिलं

संसार सुखाचा , खूब झाला असता
जर नाही ऐवजी तुझा , हो आला असता

तुझं माझं जग , असं तूच होतीस सांगत
घर-अंगण-स्वप्नांची , तुझीच होती पंगत
अगदी म्हातारपणापर्यंत , तुझं सारं ठरलं होतं
आता माझं वेगळं सांगायचं , काय उरलं होतं ?

तुझ्याच साऱ्या स्वप्नात , माझा जीव रमला असता
जर नाही ऐवजी तुझा , हो आला असता

ठरलं तुझं सारं , अन तूच सोडून गेलीस
तुझं माझं नातं , तूच तोडून गेलीस
स्वप्नातला मी , मग स्वप्नातच हरवलो
तुला ठेवून उरी , तुझ्यापासूनच दुरावलो

तुझ्या जाण्याला मी तेव्हा , नकार दिला असता
तर नाही ऐवजी तुझा , हो आला असता ?

जन्माचा तो घोर , उगा उरी ठेवून गेलीस
जाता - जाता माझं , जग घेऊन गेलीस
तू नाही दिसत , असा एक क्षण नाही
सुख उरले नाही , आता आनंदाचे डोही

हि पोकळी समझण्या , मी उशीर केला नसता
तर नाही ऐवजी तुझा , हो आला असता ?


                                      - अभिषेक पांचाळ
                                      ( ९०२८८७५९५८ )