*****कसं करू गं प्रिये ?*****

Started by Shri_Mech, November 23, 2016, 06:48:51 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

*****कसं करू गं प्रिये ?*****


मन माझं तुझ्याकडेच धावतंय
त्याला आवरु कि तुझ्याकडे येऊ देऊ ?

डोळे माझे तुला पाहायचा हट्ट धरतायत
त्यांना समजावू कि तुझ्याकडे घेऊन येऊ ?

कान माझे तुझ्या आवाजाची मागणी करतायत
त्यांना गप्प करू कि तुझ्याशी बोलून तृप्त करु ?

काळीज हे तुटतंय तुझ्यासाठी
त्याला सावरु कि तुझी भेट घालून देऊ ?

हृदय हे तुला पवित्र बंधनात बांधू पाहतंय
त्याची समजूत काढू कि तूच या बंधनात सामावतेस ?

आत्मा हा तुझ्यात विलीन होऊ पाहतोय
त्याला काबूत ठेऊ कि सामावून जाऊ तुझ्यात, कायमचा ?

तुजवीण हे जगणं नकोसं झालंय
निरर्थकपणे जगू कि देतेस नाव अर्थ या जीवनाला ?

सांग ना गं प्रिये, कसं करु ?

Shri_Mech
Shri_Mech