*****अशीच असते का हो प्रेयसी...?*****

Started by Shri_Mech, November 24, 2016, 12:35:08 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

*****अशीच असते का हो प्रेयसी...?*****


कॉलेजमधे आपली वाट बघणारी
भेटायला उशीर केल्यास लटके लटके रागावणारी
वेळ पडल्यास आपल्याशी भांडणारी
पण कठीण प्रसंगी कायम सोबत राहणारी

कधी मागे लागून पाणीपुरी खायला लावणारी
तर कधी कॅडबरीसाठी हट्ट धरणारी
कधी आईसक्रीमवर ताव मारणारी
पण कधीच चिकन न खाणारी

आपल्याशी फोनवर न थांबता बडबडणारी
छोट्या छोट्या गोष्टींमधूनसुद्धा आनंद वेचणारी
भेटल्यावर मनसोक्तपणे आपल्यासोबत फिरणारी
पण बाबांचा फोन आल्यावर लगेच घरी जाणारी

कॉलेजमधे भेटूनसुद्धा मनाचा पाठलाग करणारी
तिच्या प्रेमामुळे आपली रात्रीची झोप घालवणारी
सुट्ट्यांमधे विरहाने जीव कासावीस करुन सोडणारी
पण तिच्या गोड आठवणींनी ओठांवर हसू आणणारी

खरंच, अशीच असते का हो प्रेयसी...?


Shri_Mech
Shri_Mech