एक नजर तुझी

Started by ganesh bunde, November 24, 2016, 01:24:12 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde

      !! एक नजर तुझी !!

जाता जाता एकदा तरी माझ्याकडे फिरून बघ,
नाहीतर मग,
एक गोड स्मित करुन बघ।।धु।।
लग्न समारंभात जशी तु दिसली, गोर गोर अंग तुझ त्यावर गूलाबी सलवार नेसली,
दिसताच तु काळजात बसली, रूप तुझे आणखी खूलेल, डोळ्यावरची लट जरा सारुन बघ ।।१।।
सगळ्या लग्नामध्ये माझं लक्ष तुझ्याकडे, पण तु एकदातरी लक्ष दे माझ्याकडे,
अग उगाच कशीतरी नजर मारून बघ ।।२।।
लग्न समारंभ सारा समाप्त झाला,
नवरदेव नवरीला घेऊन निघाला,
तसाच तुझ्या जाण्याचा निरोप मिळाला, आतातरी जाताना एकदा तुझे ह्रदय हारुन बघ ।।३।।
   कवी - गणेश बुंडे