कविता II हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला II

Started by siddheshwar vilas patankar, November 24, 2016, 07:42:43 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


तो का हसला ?

कसा हसला ?

हसताना कसा दिसला ?

मी नाही पाहिला

पण एक मात्र नक्की

तो हसला

हसला आणि म्हणाला वेड्या तू पण फसला

माझ्यासारखा

हे हृदयाचं गणित पडलं कि पडतं

अन मग हळू हळू उडतं , आयुष्य

ते सोडवता सोडवता

सगळं काही बिघडतं

एका वेड्या आशेवर

निर्माण होतात अनेक निराशा

आपलाच चेहरा नंतर वाटू लागतो

भूगोलाचा नकाशा

अवतरतात गंगा यमुना वेळोवेळी

दुःखरूपी विंध्य सह्याद्री असतात

उभे अचल तिन्ही काळी

आठवणी साठून साठून तप्त झालेल्या

वाळवंटाचा पसारा नकाशात

पसरत चाललेला

हेच सारं पाहून तो फक्त हसत बसलेला

तो फक्त हसत बसलेला


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C