कविता II धुंडाळ वाटा अनवाणी , ऐक पुढचे इशारे II

Started by siddheshwar vilas patankar, November 25, 2016, 02:50:27 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


उभी हयात पायात चप्पल घालून चाललीय

हळूहळू मातीशी जपलेली नाळ तूटत चाललीय

नेहेमी सावली काय कामाची

जरा असू दे सवय शरीरास डबडबणाऱ्या घामाची

ते रुतणारे काटे असेच सुकले

वाट पाहुनी अनवाणी पायांची

तळमळून प्राणास मुकले

बघावे तिथे बंदिस्त खिडक्या न दारे

कसा ओळखशील तू बदलणारे वारे

धरा अनोळखी झाली , त्या स्पर्शास मुकली

धुंडाळ वाटा अनवाणी , ऐक पुढचे इशारे



सिद्धेश्वर विलास पाटणकर C




सिद्धेश्वर विलास पाटणकर C