प्रेमाच्या शोधात.....

Started by yogesh81, January 08, 2010, 02:50:29 PM

Previous topic - Next topic

yogesh81

आपण आपल्याही नकळत हसत-खेळत असतानाच कधी लहानाचे मोठे होतो कळत नाही.  आपल्या कोषातून बाहेर पडावं लागतं.  आई-वडिलांचा हात हातातून सुटतो आणि जगाच्या गर्दीत आपण ढकलले जातो. पण त्या गर्दीत सुद्धा आपण एकटेच असतो. अशावेळी आपल्याला गरज वाटते ती अशा माणसाची जो आपला असेल ज्याच्याकडून आपल्याला मिळेल प्रेम, आपुलकी, आधार. अशी माणस मिळतातही गोड बोलणारी, आपलीशी वाटणारी. पण काही काळ गेल्यावर कळत ती मानस आपली कधी नव्हतीच. ते आपल्याजवळ येतात आपल्याशी गोड बोलतात ते फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी. खरंतर त्यांच्यालेखी आपली काहीच किंमत नसते. ते आपल्याला विसरून जातात आणि आपल्याकडे उरतो फक्त त्रास. मग वाटतं या जगात निःस्वार्थ प्रेम, आपुलकी नसतेच का?......असते......आपल्यावर असे प्रेम करते ती आपली आई.
आई आपल्याला जन्म देण्यासाठी त्रास सहन करते आणि आयुष्यभर आपल्याचसाठी त्रास काढत असते बिनशर्त. पण ते आपल्यालाच काळात नाही. आपण चुकू नये आपलं पाऊल वाकड पडू नये म्हणून प्रत्येक पावलाला आपल्याला जपते, सावध करते आपण कितीही मोठे झालो तरी. आपल्याला ते बंधन वाटतं, त्रास वाटतो. पण ती असं करते कारण तिच्या पोटात असते तळमळ आणि प्रेम. आपण मात्र  लोकांच्या ढोंगीपनाला प्रेम समजून बसतो.

santoshi.world