प्रेम

Started by Dnyaneshwar Musale, November 27, 2016, 08:18:45 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

सगळं कसं सुरळीत
असतं
जेव्हा कुणी आपलं
आपल्या सोबत असतं
भले  आज मी बोलत ही
नसेल
पण माझ्या न बोलण्यालाही
हसेल.
तसं  काय सगळंच प्रेम शब्दांत मांडता
येत नाही
दरदिवशी अनुभवावं,
उमलणाऱ्या जीवनातुन काही.
अगदी माठा प्रमाणे,तो ठरवत ही नाही किती पाणी थंड करायचं, पण पाझरत राहतो तस तसा गोडवा वाढत राहतो,
आयुष्याचं तसंच प्रेम करत राहायचं, आनंददायी जगण्याचा रस पेरत जायचं.
अनं डोक्यात हजारो उसवत असलेल्या गोष्टींना एक प्रेमाचा टाका मारून मोकळं व्हायचं.
शेवटी एवढंच
प्रेम म्हणजे आयुष्य ,
आणि आयुष्य म्हणजे प्रेम.