स्वप्न

Started by Balaji lakhane, November 28, 2016, 08:30:01 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

--------------------स्वप्न---------------------

स्वप्न मला रात्रीला रोज रोज हो पडतात,
स्वप्नात पण अनेक सुंदर गोष्टी घडतात.!

पुजा, राणी, रूपाली, लक्ष्मी, कविता,
ह्याच मुली माझ्या रोज स्वप्नात येतात.!

पुजा हसत हसतच माझ्या स्वप्नात येते,
येताच माझ्या मनाची तार छेडून जाते.!

कधी राणी येते चेहऱ्यावर नाराजी घेवून,
मग मीच कंटाळतो तीचा नाराजी काढून.!

दुसऱ्या रात्री लगेच आगमन रूपालीच,
तिच्या सोबत गीत गावं लागत प्रेमाच.!

रूपालीच्या नंतर लगेच प्रिय लक्ष्मी येते,
रागात बोलते विसरलास बाल्या म्हणते.!

सर्वात शेवटी येते माझी लाडकी कविता,
तिला पाहून सुचते आजून एक कविता.!

असचं स्वप्नात येण यांच सुरू असतं,
प्रेम नाही तरी आहेच म्हणाव लागत.!

-----------बालाजी लखने(गुरू)-----------
             उदगीर जिल्हा लातूर
             भ्र...८८८८५२७३०४