माझ्या निवडक प्रेम कविता - चारोळ्या - सनिल पांगे

Started by सनिल पांगे....sanilpange, November 28, 2016, 12:41:40 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

कधी सांगशिल, ह्या जगात
कोण सर्वगुण संपन्न आहे
आकाशात कधी चंद्रा कडे बघ
त्याचंही गुणांचं घर अपूर्ण आहे.........

पांढऱ्या शुभ्र त्याच्या त्वचेत
कही काळेकुट्ट डाग आहेत
श्रीरामाच्या जिवनी संशयाचा अवगुण
हा त्याच्या नशिभाचा भाग आहे........

मी एक साधा मनुष्य आहे
मी कसा मग वेगळा असणार
माझ्या आयुष्याचा घडा कुठून
गुणांनीच भरला सगळा असणार........

तरीही तुझ्यासाठी सुधरायचं होतं,
पण संधी देण्याची तुझी तैयारी नव्हती
दर्जा नावाचं मंदिर ऊंच ऊभारलसं,
पण चढावं म्हंटलं तर पायरी नव्हती

*******सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

फोल सगळे रुसवे-फुगवे,
क्षणिक असतात डाव सारे
तुझ्याशी भांडले, कितीही रुसले
शेवटी तुझाच मला लगाव ना रे
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

तुझ्या माझ्या नात्याला
नाव अस कोणतच नाही
खरतर नावाने मर्यादा पडतात
आपल्या नात्याला अंतच नाही..

एखादं नातं असं असतं
ज्याला नाव द्यायचं नसतं
हृदयाच्या आकाशगंगेला
क्षितीजाचं गाव द्यायचं असतं
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

खरचं सांग पहील्या नजरभेटीत
तुझ्याच स्वप्नांना भेटलेलीस ना
त्या रात्री आरश्या समोर
लाजत लाजत नटलेलीस ना
@ सनिल पांगे   


सनिल पांगे....sanilpange

संध्याकाळ कलंडे पर्यंत
तुझ्या माझ्यात अंतर होतं
अंधार पडताच कोणत्या प्रकाशाचं
माझ्या मिठीत रुपांतर होतं
@ सनिल पांगे




सनिल पांगे....sanilpange

प्रिती मध्ये स्वार्थ कशाला
प्रीतीत साधी अपेक्षाही ठेऊ नये
तिथे विश्वास नांदावा इतका....की
वचनही देऊ वा घेऊ नये
@ सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

तुला घेऊन येणाऱ्या स्वप्नांचा
मी प्रचंड आभारी आहे
तेवढेच काही क्षण जिवनात
सुखाची उधारी आहे
@ सनिल पांगे



[/font]

सनिल पांगे....sanilpange

तू जिवनातून वजा होताना
प्रथमच स्वच्छंद हसत होतो
जमले सारे किनाऱ्यावर
मी मंद मंद दिसत होतो
@सनिल पांगे

सनिल पांगे....sanilpange

चांदण्यांच्या लाटा येती नभाच्या काठी गं....
मंद मंद शीतल प्रकाश बांधून गाठी गं.....
तेव्हां अनुभवलास तो फक्त तुकडा होता....
आज हा पौर्णिमेचा चंद्र तुझ्याच साठी गं....
@ सनिल पांगे