जीवनाच्या मंद झुल्यावर

Started by sagar dubhalkar, November 28, 2016, 10:30:57 PM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

जीवनाच्या मंद झुल्यावर
धुंद होऊन झुलत बसू नको
जागा होऊन सतर्क राहा
दुसऱ्यांच्या गोष्टीवर झुलत बसू नको

स्पर्धेशी स्पर्धा करताना
नुसतं पळत बसू नको
आणि एका अपयशापायी
स्वतःला छळत बसू नको

जगायचं  असेल तर
जिवंत होऊन जग
स्मशानातल्या मङयाप्रमाणे
मनाला जाळत बसू नको

तळहातांवरल्या रेषांवर
भविष्य पाहत बसू नको
जगतोय तर भरभरून जग
आयुष्य वाहत बसू नको

दगडाच्या जगात राहताना
मन तुझं पाषाणी असू दे
दीन दुबळ्यांसाठी डोळ्यांत तुझ्या
अश्रूंचं पाणी असू दे

इमारतींची जंगले वाढली तरीही
झोपड्यांची कुरणे तशीच आहेत
भिकाऱ्यांच्या भिकारीपणाची
गोष्ट तुझ्या कानी असू दे

मित्रांनो माझ्या ब्लॉग ला भेट देऊन प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
http://sagardubhalkar.blogspot.com
    9604084846