गुरूच्या कविता...

Started by Balaji lakhane, November 29, 2016, 11:33:28 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

--😃--तुझ्या पेक्षा सुंदर आहे ती--😃--

तुझ्या घराची वाट मला,
आता दिसेना गवसेना.!
माझ्या घरा जवळ एक,
आभाळातली परी राहतेना.!

पुर्ण दिवस निघून जातो,
तिला पाहण्यात बोलण्यात.!
आता ती ज्याम भरली,
गं सखे माझ्या मनात.!

काय सांगू मी तुला,
गोष्ट गं तिच्या रुपाची.!
आता तीच राणी आहे,
कायम माझ्या ह्रदयाची.!

वाऱ्या प्रेमाणे स्पर्श करते,
हळूवार मनाला माझ्या.!
तू समजली नाहीस पण,
ती समजली प्रेमाला माझ्या.!

म्हणते गं मला "गुरू" किती,
सुंदर प्रेम कवीता लिहीतोस.!
खरचं का रे पिल्लू तू माझ्यावर
येवढं जीवापाड प्रेम करतोस.!

तू गेल्यापासुन फक्त बघं,
आनंदात चालयं आयुष्य.!
आता मी लिहिणार तिच्या,
सोबत गं माझं भविष्य.!

तू हि आहेस सुंदर पण,
ती तुझ्यापेक्षा भारी आहे.!
माझ्या मनाला समजणारी,
मनाची ती खुप गोड आहे.!

आयुष्य तिच्या सोबत ,
पुर्ण जगायचं मला आता.!
कधीच वळून पाहणार नाही,
पोरी तुझ्या कडे गं आता .!

------😂---बालाजी लखने(गुरू)---😂-----
                उदगीर जिल्हा लातुर
                भ्र. ८८८५२७३०४

विजय वाठोरे सरसमकर



गुरूच्या कविता....
जबरदस्त ......