***** जमलंच नाही *****

Started by Shri_Mech, November 29, 2016, 12:26:22 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** जमलंच नाही *****


मनाने खूप आवाज दिला होता
पण तिच्यापर्यंत हाक पोहचलीच नाही

खूप धडपडलो व्यक्त होण्यासाठी
पण सगळं कधी फसलं कळलंच नाही

मी स्वप्न रंगवत राहिलो
पण तिचा रंग त्यात उतरलाच नाही

खूप प्रयत्न केला समजवायचा
पण तिचा राग शमलाच नाही

खूप विचार करून झाला
पण चूक उमगलीच नाही

सगळ्या गोष्टी जमवून आणल्या
पण तिचा होकार मिळवणं जमलंच नाही

प्रेम करायला तिच्याकडून शिकलो
पण बाहेर पडणं शिकलोच नाही


Shri_Mech
Shri_Mech