जरी अनेक

Started by sanjaykanha, November 29, 2016, 11:15:07 PM

Previous topic - Next topic

sanjaykanha

*।। जरी अनेक ।।*

ग्रह-तारे जरी अनेक
आकाशास शोभा देती ।
चांद नाही त्या रात्री
अंबरा काळीमा येती ।।१।।

नदी-डोंगरे जरी अनेक
धरणीस रूप देती ।
वृक्षवेली नाही त्या किनारी
मही ओसाड दिसती ।।२।।

धन-दौलत जरी अनेक
जीवन आनंदी करती ।
दया प्रेम समता न ठायी
व्यर्थ जगणे त्याचे अंती ।।३।।

नाती-गोती जरी अनेक
माणसास भेट देती ।
आई बापास न मान जेथे
प्रेम वात्सल्यांची त्यास खंती ।।४।।

नाव-प्रसिद्धी जरी अनेक
अहंकार त्यांच्या भोवती ।
कान्हा म्हणे जो आत्मारामी
गातो रोज त्यांची आरती ।।५।।

कवी संजय कान्हव
मोबा 9850907498
धारगाव नाशिक
🙏👏🙏👏🙏