कविता II आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो II

Started by siddheshwar vilas patankar, December 01, 2016, 02:48:43 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो

प्रेमाच्या दलालीचे खांब रोवले जातात

हळुवार एकेक आठवण नकळत

त्या खांबावरून वेलीसारखी चढत जाते

मग विरहाचे ऊन सावलींनी झाकले जाते

ती प्रत्येक भेट , ते स्थळ , ते एकत्र घालवलेले क्षण

असेच बिलगून असतात

डोळे बंद करताक्षणी

झपकन पंख पसरतात

तू होतीस तेव्हा सुद्धा आणि तू नसताना पण

हे सारे माझे अबोल साथी असतात

शामियाना असाच उभा असतो

मी मात्र तळमळून त्याखाली

नित्य तुझी वाट पाहत असतो 


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C