तु

Started by Dnyaneshwar Musale, December 01, 2016, 09:40:50 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

फुलातला मकरंद तु
अबोलीची कळी तु
धुंद गार वाऱ्याची
फळी तु,
लाजाळू परी लाजणारी
गालावरची खळी तु.

वसंततातला बहर तु
चैत्रातला कहर तु
मऊ मऊ कापसाची
वात तु
सणासुदीचा गोड भात तु.

गहिवरलेल्या मनातील
मोकळीकतेचा घास तु
काजव्यांच्या  लुकणाऱ्या
प्रकाशाचा एक भास तु
आयुष्याच्या वर्तुळाचा
व्यास तु.

पावसाची बरसणारी
सरी तु
चोरट्या माझ्या मनाहुन खरी तु
अंगणातल्या वृंदावणातली तुळस तु
माझ्या कवितेचा कळसही तु.






sagar dubhalkar


Dnyaneshwar Musale

धन्यवाद