तुझे वळुन बघणे.....

Started by विजय वाठोरे सरसमकर, December 02, 2016, 09:41:47 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


तुझे वळुन बघणे.....(अष्टाक्षरी )

काय सांगु सये तुला
खुप सतावते मला
तुझे वळुन बघणे
तुझे हसुन बोलणे

तुझ्या अदांची किमया
खुप छळतेस मला
रुपाची लावण्य परी
खुप भाळतेस मला

तुझ्या ओठांची हि लाली
करते मला बेधुंद
तुझ्या बोलण्याची ढब
तुझ्यातच झालो धुंद

तुझे मिचकेसे डोळे
कहर माजवतात
तुझे हे रेशमी केस
कवीता सजवतात


...........साहिल...........
विजय वाठोरे सरसमकर
02/12/2016
9975593359