झेंडा

Started by pomadon, January 08, 2010, 09:11:25 PM

Previous topic - Next topic

pomadon

                  


 झेंडा
जगण्याच्या वारीत मिळेना वाटं...हो...
साचले मोहाचे धुके घनदाटं...हो...
आपली माणसे ..... आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भीती ...
विठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...
आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताचं त्यांचा देव होता..
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता...
उजळावां दिवा म्हणूनिया किती
मुक्या बिचा-या जळती वाती
वैरी कोण आहे, इथे कोण साथी
विठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...
बुजगावण्यागतं व्यर्थ हे जगणं
उभ्या उभ्या संपून जाई
कळ रितं रितं माझं बघुनी उमजलं
कुंपण इथं शेतं खाई
भक्ताच्या कपाळी सारखीचं माती तरी
झेंडे येगळे, येगळ्या जाती
सत्तेचीचं भक्ती, सत्तेचीचं पीरती
विठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...




MK ADMIN

We do not support piracy of music at any cost. The download link posted for Zenda songs are deleted.

Do not post links to download songs on MK. Read the Rules.

gaurig

जगण्याच्या वारीत मिळेना वाटं...हो...
साचले मोहाचे धुके घनदाटं...हो...
आपली माणसे ..... आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भीती ...
विठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...

Very true.....