ओत जरा मित्रा...

Started by गणेश म. तायडे, December 03, 2016, 08:10:23 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

ओत जरा मित्रा
आज घेऊच दे मला
मनातील सारं काही
आज काढू दे मला
बस माझ्या सोबत
जरा ऐकून घे मला
ठेव खांद्यावर हात
थोडं समजून घे मला
घालमेल सुरु आहे मनी
काहीच कळेनासे झाले
जे होते काल आपले
तेच आज परके झाले
त्यागूनी सारे काही
ज्यांसाठी धडपडत होतो
त्यांसाठी मी आता
नजरेआड झालो होतो
झालो मी एकटा
नाही साथ कुणाची
शोधतो चाहूल मी
सारं पुर्ववत होण्याची
आधार दे मला
आज रडू दे तुझ्यापाशी
ओत जरा मित्रा
आज घेऊच दे जराशी

- गणेश म. तायडे, खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com