* नको जाउस सोडुन मला *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 04, 2016, 08:42:13 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

राजसा साजणा कारे रुसला
बघ तरी एकदा वळुन
काटा माझ्या काळजात रुतला
नको जाउरे सोडून मला

कारे छळतोस असा मला
काय चुकले माझे...?
सांग तरी मला...!
सोड हा जीवघेणा अबोला

राजकुमार तु माझ्या स्वप्नातला
किती व्रत वैकल्य केली
तुझ्यासाठी मंदिरी पुजा केली
तेव्हा कुठे तु भेटला

उधळुन माझ्या सर्वस्वाला
परमेश्वर मानिले तुला
जपत आली तुझ्याच सुखाला
तरी का रडवतोय मला

माझ्या प्रेमाच्या शपथा देते तुला
नको तोडु आपल्या नात्याला
सांगशील तशी वागेन रे मी
दासी बनुन सेवा करेन तुझी

नकोरे वेगळे करुस स्वतापासुन
तुझ्या मिठीत घेरे मला
नाहीतर मीच सोडून जाईल
कायमची या जगाला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938