तुझ्यासाठी...

Started by गणेश म. तायडे, December 04, 2016, 10:47:10 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

खुप दिवस झाले
तुझ्यावर कविता लिहून
होतो थोडा त्रस्त
तुझा दुटप्पीपणा पाहून
मात्र आता मी सारे
विचार सोडून दिले
तुला जसं हवं तसं
तुझ्यावर सोडून दिले
तुला हवे किंवा नको
पण प्रेम करत राहिल
तु कितीही दुर गेली
तरी तुझ्यावर...
प्रेम करत राहिल
वाच माझ्या कविता
किंवा नको तु वाचू
भावना आहेत तुजसाठी
मात्र शब्दांना नको ठेचू
शब्द शब्द गोळा करून
तुझ्यासाठी लिहित आहे
रोखून आसवांना आज
मन मोकळं करत आहे

- गणेश म. तायडे, खामगांव
   www.facebook.com/kavitasangrah11

tusharkasar1989