अजूनही पहिल्यासारखाच...

Started by Pravin Raghunath Kale, December 04, 2016, 05:11:08 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

अजूनही पहिल्यासारखाच...

तु आठवत राहते मला
अगदी आजही
तशीच पहिल्यासारखीच

रात्री बेडवर पडल्यावर
छताकडे पाहिले कि
त्या रात्रीच्या पहिल्या प्रहरी
तु उचंबळून येते मनात
अजूनही पहिल्यासारखीच

सभोवतालच्या सार्‍या जगाने
अंधार पांघरूण घेतल्यानंतरही
तु मात्र माझ्या मनात
लखलखीत प्रकाश पाडत असते
तुझ्या आठवणींचा
अजूनही पहिल्यासारखाच...

प्रविण रघुनाथ काळे
मो. ८३०८७९३००७
like My FB Page - www.facebook.com/kalepravinr