रात्रीच्या निरव शांततेत...

Started by Pravin Raghunath Kale, December 04, 2016, 05:16:35 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

रात्रीच्या निरव शांततेत...

घड्याळात रात्रीचे कितीतरी वाजलेले
खिडकीबाहेर सारा अंधार दाटलेला
उकाडय़ाने मनात गोंधळ मांडलेला

तरीही पंखा फिरत असतो,
आपल्याच धुंदीत
आपल्याच गतीत, अव्याहतपणे

डोळ्यांनी भिरकावून द्यावे
झोपेचे पांघरून
मनाने कितीदा पाहावे
स्वतःलाच समजावून

रात्र सरत जावी,
पंख्याप्रमाणे घरघरत
मनेने अस्वस्थ व्हावे
हाती पेन धरत

आणि लिहाव्यात
चारदोन ओळी
रात्रीच्या निरव शांततेत...

प्प्रविण रघुनाथ काळे
मो. ८३०८७९३००७
like My FB Page - www.facebook.com/kalepravinr