थंडी

Started by गणेश म. तायडे, December 05, 2016, 10:22:52 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सर्दी खोकल्याने आज
झाले सारे थंडे
डॉक्टर जवळ गेलो तर
म्हणे खात जा अंडे
थंडी एवढी वाजते
कि अंगात भुकंप येते
कधी दातावर दात तर कधी
हातावर हात चोळा लागते
थंड पाण्याला पाहूनही
आता येतो अंगावर काटा
आंघोळीशिवायच काही तर
पकडतात आपल्या वाटा
गोरे गोरे चेहरे पण
आज गुलाबी झाले
सावळ्यांच काय होईल
ते अजून सावळे झाले
या वेळची थंडी
आहे खरंच लय भारी
काळजी घ्या मित्रांनो
साऱ्यांना शुभ हिवाळी

- गणेश म. तायडे, खामगांव
   www.facebook.com/kavitasangrah11