वाटेवरून परतीच्या

Started by शिवाजी सांगळे, December 05, 2016, 03:39:01 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाटेवरून परतीच्या

वाटेवरून परतीच्या, बरेच काही शिकून आलो,
स्नेह ममत्वाचे, परक्या लोकात शोधुन आलो !

डाव बेईमानीचे, रक्तात नात्यांच्या ह्या रुजलेले,
आप्त स्वकियांचे, खरे मुखवटे पाहून आलो ! 

वल्गना सुखाच्या, कित्तेक ज्या ऐकल्या होत्या,
सोहळे दु:खाचे, त्यातील प्रत्यक्ष भोगुन आलो !

सापळे मरणाचे, रोज येथे कुणी हे लावलेले,
चिरंजीव नसताही, मृत्युला हूल देवून आलो !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९