कविता II तुझ्या मागून चातकांचे थवे उडाले II

Started by siddheshwar vilas patankar, December 05, 2016, 07:45:07 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

तुझ्या मागून चातकांचे थवे उडाले

खड्ड्यात गेला पाऊस सारा

खड्ड्यात गेले थेम्ब अन धारा

नयन बाणांनी घायाळ बिचारे

सर्व तुझ्या संगे निघाले

टोक टोक , टोक टोक उगाच मधेमधे

एक सुतारपक्षी करतच होता

तू सांगितलं तेव्हा उमजलं

तो तर तुझा बाप होता

त्याच्याकडे बघून वाटले

तुझ्याशी दूरवर संबंध नव्हता

तुझा बाप डोक्याला ताप झाला

साऱ्या चातकांचा सुतारपक्षी झाला

दर्शन दुर्लभ झाले म्हणून

सर्वजण टोक टोक करू लागले

भिंतीवर डोकं आपटून आपटून

दिसेल तिथे भोक पाडू लागले



सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C