दुटप्पीपणा...

Started by गणेश म. तायडे, December 05, 2016, 08:36:32 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

डोळ्यात मी होतो
पण नजर दुसरीकडे
प्रेम एवढे दिले तरी
तुझे मन का वळे?
हातात हात होता माझ्या
स्पर्श मनी होता कुणाचा
मिठीत होतो मी पण
विचार होता कुणाचा
हवे होते जे सारे काही
ते आज नकोसे झाले होते?
मनाच्या विरुद्ध जाऊन
सारे जबरदस्तीने घडत होते
मी हवा आहे पण
त्याला सोडायचे नाही
मनात तुझ्या मला
कुणासोबत रहायचे नाही
समजून घे मला कि
नकोच तु समजून घेऊ
बोलून टाक एकदाचे सारे
पण खोटी आश्वासने नको देऊ...

- गणेश म. तायडे, खामगांव
   www.facebook.com/kavitasangrah11