एखाद्या रविवारी*****

Started by suraj patil 1107, December 05, 2016, 09:23:35 PM

Previous topic - Next topic

suraj patil 1107

एखाद्या रविवारी
येतील तिला पाहुणे बघायला,
ती अशी इतर मुलींप्रमाणेच
जाईल सामोरी नटून थटून
छानसा मेकअप वगैरे करुन..

नाव गाव होतील विचारुन
ठरवलेली उत्तरे देऊन
ती ही लाजेल हलकेच
रिवाजाप्रमाणे

येणी-जाणी होतील
पसंतीही कळवतील
देनी-घेणी ठरतील
ऐपतीप्रमाणे

एखाद्या रविवारी
ती मला भेटेल
अश्रु डोळ्यातुंन काढेल
माफ़ कर म्हणेल
नेहमीप्रमाने

नाही जाऊ शकत
आईवाडिलांच्यापुढे
कळवळून म्हणेल
प्रेयसीप्रमाने

एखाद्या रविवारी
ती वेळ काढेल
फेसबुक deactivate करेल
व्हाट्सएप्प delete करेल
No. Delete मारेल
प्रथेप्रमाणे

एरव्ही खुप बोलनारी
अबोल होईल ती
अल्लड़ असणारी
समजदार होईल ती
गरजेप्रमाणे

एखाद्या रविवारी
विचारांची तूफ़ान गर्दी
माझ्या मनात उठेल
उत्तर नाही मिळणार
अपेक्षेप्रमाणे

'तुझ्याशिवाय रे मी
नाही जगु शकत'
हे खरं होतं की खोटं?
मन उगीच माझं
गोंधळल्याप्रमाने

एखाद्या रविवारी
लागेल तीच लग्न
कुणाचीतरी पत्नी बनून
होईल संसार चालू
परंपरेप्रमाणे

एखाद्या रविवारी
मी बसेल शोधत
प्रश्नांची उत्तरे
ती रमली असेल का
तिच्या त्या संसारात?
सराईताप्रमाणे

हे सर्व इतकं सोपं असतं का?
भाव भावनांचा हा गुंता
सोडवता येईल का?
वेळ काढून कधी
एखाद्या रविवारी
© सुरज पाटील
surajpatil1107@gmail.com