प्रेमात कोण बेवफा होतं? *****

Started by suraj patil 1107, December 06, 2016, 12:04:36 PM

Previous topic - Next topic

suraj patil 1107

प्रेमात कोण
बेवफा होतं?

मुले की मुली?
उत्तर अवघडच

कोण विसरुन जातं लवकर
घडलेलं सर्व काही
मुले की मुली?

कोण विरहात तडफडत
रात्र-रात्र
मुले की मुली?

कोण स्वार्थ बघतं
स्वतःच्या सोयीचा
मुले की मुली?

असं म्हणतात की
मुली जास्त पटाईत असतात

पण तरीही मुलीपण
दिसातातत ना
विरहात झुरताना...
मनोमन मरताना...
क्षणोक्षणी स्मरताना...

मग मुले का...?
तर तसेही नाही.

तोही
झुरतोच आठवणीत
रडतोच अंधाऱ्या रात्रीत
कोलमडतो अधांतरीच...

तर मग कोण बेवफा होतं...?

कधी आंधळ्या असणाऱ्या प्रेमातला
डोळस झालेला स्वार्थ
कधी फायदा करुन प्रेमाचा मतलबी घेतलेला अर्थ
कधी परिस्थितीपुढे घेतलेली माघार
कधी धर्म, कधी जाती, कधी समाज या कारणाने प्रेमाला केले जाते निराधार
कधी प्रेमाकडे टाइमपास म्हणून बघायचं
तर कधी प्रेमाला एक व्यवहार समजायचं

आणि हे करणारा कधी मुलगा असतो तर कधी मुलगी...

अशावेळी दुसर्याचं 
मन पंगू होतं...
कोलमडून पडतं...
झुरत राहतं...
मन मरत जातं...
कारण शोधत राहतं...
चुकीचं-बरोबर गणित करत राहतं...

प्रेम हि भावना एवढा त्रास देते का?
मन उगीच विचारत राहतं...
आपण जिच्यावर प्रेम केलं तो/ती बेवफा निघाली का...?
प्रश्न पडत जातात...
उत्तर विरत जातात
स्वप्न चिरत जातात...
अश्रू डोळ्यात दाटतात...
उर फाडत जातात...

एक भयाण शांतता निर्माण होते मनाच्या गाभारी
आणि किती हि समजावलं तरी लागते ती जिव्हारी

आणि मग प्रश्न पडतो स्वतःला च खरंच
प्रेम असंच असतं का????
© सुरज पाटील
surajpatil1107@gmail.com