सल

Started by Anil S.Raut, December 06, 2016, 10:01:08 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

:::::::::: *सल* ::::::::::

माहित आहे रे,तू कधी अंतर देत नाही
पोटातली बात कधी ओठावर येत नाही!

जे बोलतो ते पोपटासारखे गोड भासते
पेरुची ती फोड माझ्या ताटावर येत नाही!

तू फूल आहेस सुगंधी वदती लोक सारे
कळी त्या फुलाची माझ्या देठावर येत नाही!

कुबेर तू...वरुण तू धनाचा,रे जगासाठी
मोहोर कधी ती माझ्या हातावर येत नाही!

सांगतोस नाते एकोप्याचे..चल ठीक आहे
सल दाण्यांची दिसून धाटावर येत नाही!

एवढा नको लावू जीव,श्वास गुदमरेल
डुचमळणारे प्रेम काठावर येत नाही!

मी कोण..तू कोण?सारे मनाचे खेळ अंधारी
नशा तृप्तीची आशेच्या घोटावर येत नाही!

     ✒ *अनिल सा.राऊत*
       📱 _9890884228_