कशी असावी ती

Started by Pujari Santosh, December 07, 2016, 05:42:08 PM

Previous topic - Next topic

Pujari Santosh

काही नको पण ती सुंदर असावी,
तनाने का नसेना पण मनाने असावी.

चार-चौघात उठून दिसणारी असावी,
आपलस करून नात जोडणारी असावी. 

स्वतः सोबत माझ्यातही  रमणारी असावी,
आमच्या नात्याला  घट्ट जपणारी असावी.   

काही नको पण ती सुंदर असावी,
तनाने का नसेना पण मनाने असावी.

सोबत तिची सावली प्रमाणे असावी,
गुलाबाच्या कळीप्रमाणे ती हसावी,

वाणीने मधुर अन्  नजरेने प्रेमळ असावी,
अशी ती माझ्या आयुष्यात यावी.

काही नको पण ती सुंदर असावी,
तनाने का नसेना पण मनाने असावी.  :-*

- ✍ S@n£ SP