असावा असा एक रस्ता...

Started by गणेश म. तायडे, December 07, 2016, 09:03:01 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

असावे तु, असावा मी
असावा असा एक रस्ता......
हातात हात, मनाची वाट
डोळ्यात तु, मनात मी
पहावी वाट, प्रत्येक क्षण
बोलावे सतत, मनोमन
असावा असा एक रस्ता...
जीवात जीव, श्वास सुगंध
तुझ्यात मी, माझ्यात तु
मोहक स्पर्श, शब्दांचा डाव
ओवाळावे मन, जीवेभाव
असावा असा एक रस्ता...
चालत जावे, कुठे निवांत
नसावा कुणाचा आक्षेप
बसावे निवांत, असावा एकांत
पहावे डोळ्यात, तासनतास
असावा असा एक रस्ता...

- गणेश म. तायडे, खामगांव
   www.facebook.com/kavitasangrah11