मुक्तहास्य

Started by sachinikam, December 08, 2016, 10:26:18 AM

Previous topic - Next topic

sachinikam


मुक्तहास्य


बेंबीच्या देठापासून काळजाच्या काठापर्यंत
हृदयाच्या गाभाऱ्यातून मनाच्या लाटांपर्यंत
स्मित का होईना हसू उमटूदे मुखावर
पुरे झाले आता रुसणे सुखांवर


जे काही साठलय मनात मोकळ कर थेट
नाही पटल तर मौन पटल तर गळेभेट


येन केन प्रकारेन व्यक्त करशील स्वतःला
नाही तर घुसमटून आत मारशील स्वतःला


इतरांच्याही भावनांना देशील प्राधान्य
कलागुणांनाही दाद देशील अनन्य


संकटांचा करशील हसून सामना
आपोआपच पुऱ्या होतील मनोकामना


गंभीर परिस्थितीला हसण्यावर नको घेऊ
जन्ममरणाचा प्रश्न टोकालाही नको नेऊ


इतके सोपे आहे जीवनाचे रहस्य
भवताली दरवळूदे प्रसन्न "मुक्तहास्य".


कवी: सचिन निकम
कवितासंग्रह: मुकुटपीस
९८९००१६८२५, sachinikam@gmail.com
:) ;) :D ;D