कविता II लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी II

Started by siddheshwar vilas patankar, December 08, 2016, 03:30:39 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

निर्व्यसनी असाल तर नको ती सवय लावून घ्यावी

व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा 

लिटमस पेपरवरी

जर सामू आला सात

लग्नास नसावी हरकत

जर त्यामध्ये असेल चढउतार

घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातून

सवयीनुसार सामूची वर्गवारी

तंबाखू असे तीनवरी

सुपारीसहित तोच बसे पाचवारी

सोडामिश्रित आठवरी तर

ऑन दि रॉक्स ती दहावरी

देशीसाठी नसे चाचणी

देशी असे जनावरी

लक्षात ठेवा नवरोबानो

अर्धांगिनी पण लिटमस परी

सुटणार नाहीत नाद कुणाचे

मग असाल तुम्ही रडारवरी

व्यर्थ नका मरू दादा

घ्या लिटमस पेपर साधा

व्यसनांती पण सामू सात असेल

तरच निवडा आपली राधा

जर हे सर्व व्यवस्थित असेल

तर आणि तरच बोहल्यावर चढा

नाहीतर रामदास स्वामींप्रमाणे

सावधान ऐकताक्षणी सरळ मंडपाबाहेर पडा


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C