झाली झांजरं झांजरं झांजरं

Started by sanjay limbaji bansode, December 09, 2016, 02:32:51 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

फुटला आकाशी तांबडा पाझरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

खोप्यात पाखरू, घेई खुशीत लेकरू
गोठ्यात वासरु, दूध पिये चुरूचूरू !

गाय चाटती खुशीमंधी वासरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

ठोकली आरोळी, बाग दिली कोंबड्यानं
धुडगूस घातला त्या, कळपात मेंढरानं !

डोळं चोळीत उठलं पोरं साजरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

लाडी गोडी करी सखा,मैना चोरीते अंग
दाने टिपण्या पिल्ले, फिरती कोंबडी संग !

भरती नळावर कुणी त्या घागरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

संजय बनसोडे 9819444028

siddheshwar vilas patankar

सुंदर वर्णन केलंय आणि शब्दबद्ध सुध्दा . डोळ्यासमोर अक्षरशः माझं गाव उभं राहिलं . सुंदर कविता .....


siddheshwar vilas patankar
सिद्धेश्वर विलास पाटणकर C