प्रेम कसे केले?

Started by गणेश म. तायडे, December 09, 2016, 05:26:08 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

कळाले नाही मला आजपर्यंत
मी तुझ्यावर प्रेम कसे केले?
तुझ्या बोलक्या डोळ्यांत तर
कधी तुझ्या शब्दांत मन कसे गुंतले?
तुझे बोलणे आहे असे
वाहून जावे वाळूने पाण्यासंगे जसे
तुझे हावभाव सांगती मज सारे
फूलले नाते जणू सगळ्यात न्यारे
तुझे ते हसणे, उगाच नाक मुरगळणे
डोळ्यांतून सांगून, मनातले कळू न देणे
लहानग्या बाळापरी तु हट्ट करणे
थोडं रूसून, गाली फुगून मजशी भांडणे
नंतर येऊन लडीवाळ तुझे ते हसणे
ओढ लावी हे सारे, मन माझे वेडावले
कळाले नाही मला आजपर्यंत
मी तुझ्यावर प्रेम कसे केले?

- गणेश म. तायडे, खामगांव
   www.facebook.com/kavitasangrah11