क्षणाची भेट

Started by mahesh jadhav, December 09, 2016, 09:03:39 PM

Previous topic - Next topic

mahesh jadhav

क्षणाची भेट

दुरूनं भेटली ती
hi म्हणूनं आली....
अन रिक्षात बसूनी तिच्या
by म्हणुनं गेली....

फुटले नाही शब्द
दोघे जशे निःशब्द
बोलायचे होते खुप
पण वेळ निघून गेली....
अन रिक्षात बसूनी तिच्या
by म्हणुनं गेली....

अजुन ऐकतो हाकं
क्षणाची भेट जाळी
जन्माची एक ती
आठवनं ठेवूनं गेली
अन रिक्षात बसूनी तिच्या
by म्हणुन गेली....

वाटले ना मला कधी
अशी वेळ जुळून आली
नकळत शब्द माझे
ती चोरून घेवुनं गेली
अन रिक्षात बसूनी तिच्या
by म्हणुनं गेली.... 
            कवी:- महेश भा.जाधव
                          (नगरसुल)
                   9545094946
:-महेश भा.जाधव नगरसूल
     ९५४५०९४९४६