प्रणयगीत ....

Started by Kumar Sanjay, December 10, 2016, 09:59:57 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 पहिल्याच राञीचा संवाद
शब्दबद्ध अनुवाद करताना
अर्थ आणि  भावार्थ लाजलॆलॆ 
दोन श्वास एंकञित होवुन
प्रणय काव्य रचलेलॆ

प्रीत:प्राय गुलाबी राञीचा
मनमोहक स्पर्श होत असताना
सहज सजनाच्या घट्ट
अांलिगनात विरळघळतांना
एक मन दुर तुटलेले 

शरीर सुखांतिक काम गीत रचताना
पायातील पैंजनॆ नव व्याकरण गढताना
भावनेच्या  यज्ञात आहुत व्योम होताना
एक मंञ न बोलला गेलेला

कांकनानी भरलेले हात
कानातील कर्णफूल समर्पण करताना
अोठ मोैन चुंबनी सूक्तात
ध्यानस्थ होताना
एक तपस अध्यानस्थ असलेला

घोर काकिकॆसारख्या
केसाची पिंपळ सावली होताना
सजनास त्यांत विसावा देताना
एक प्रवासी न विसावला गेलेला

राञभर बोलणं नजरेचं
हातातील हात, रुप , याैवन, गंध, अन्  स्पर्श
नवयोैवन ऋतु बरसताना
एक ऋतु पानगळलॆला

समर्पण अन् एक काळोख
काही हरवलेलॆ संकल्प वचन
उत्सवात सजलेल्या राञीला
एक प्रणयगीत लिहणारी
प्राजक्ताची भिजलेली गाञ ....

कुमार संजय ...
7709826774