स्वप्नात येणारी तू।

Started by Jayjeet, December 10, 2016, 01:12:40 PM

Previous topic - Next topic

Jayjeet

स्वप्नात येणारी तू
     सत्यात कधी येशील का ?
क्षणभर येऊनी मिठीत माझ्या
     दुःख सारे मिटवशील का ?

पोर्णिमेच्या रात्री,
     चंद्र-चांदण्या साक्षी
भेटाया मज येशील का ?
     प्रिये, तूझ्याहूनी प्रेमळ
नाही या जगात कोणी
    आभास हा मजला देशील का ?

आठवणींच्या ऊन्हात तुझ्या
     फिरतोय गं मी रानोरानी
स्वप्नातले सत्य दाखवूनी
     प्रेमाच्या सावलीत घेशील का ?

सत्यातले स्वप्न आता
     नको आहे मला
स्वप्नातले सत्य कधी
    तू मज दाखवशील का?







Jayjeet.