सिमोल्लंघन

Started by गणेश म. तायडे, December 11, 2016, 10:53:30 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सोसले आहे खुप सारे
सहन ही खुप सारे केले
उभारल्या आहेत मीच भिंती
मीच स्वतःला कैद केले
मीच कमी लेखले स्वतःला
स्वतःचेच रंग बेरंग केले
सांभाळता आपल्याच लोकांना
मीच स्वतःला जगाआड केले
पाहिले होते स्वप़्न मीही
पाखरासंगे उडण्याचे धैर्य केले
मीच छाटले पर माझे
स्वतःला हतबल मीच केले
उडण्याचे स्वप़्न भंगले
चालणेही मीच कठीण केले
देवी म्हणून मिरवले सर्वत्र
पण घरातच मला कैद केले
आज हरवले स्वातंत्र्य माझे
मीच स्वतःला आज जागी केले
ओलांडला उंबरठा आज मी
आज मी सिमोल्लंघन केले

- गणेश म. तायडे, खामगांव
  www.facebook.com/kavitasangrah11