सोडून गेली ती मला ...

Started by M Sarvadnya, December 11, 2016, 04:38:19 PM

Previous topic - Next topic

M Sarvadnya

सोडून गेली ती मला ...  :( :( :(

आज सांगतो तुम्हाला तिच्याबद्दल सगळं काही
हे कसं काय घडलं सगळं मला काहीच कळलं नाही

काय होतं रूप तिचं, होता राजेशाही थाट
या व्यवहारी जगात तीच होती माझ्या जगण्याची वाट

पहिल्यांदा पाहिलं जेव्हा तिला, तेव्हा मला खूप आनंद झाला
या जगात मी बरंच काही करू शकतो हा आत्मविश्वास आला

मी प्रेमात पडलो तिच्या, तिच्यासाठीच जीवाचं रान करू लागलो
खरंच तिच्यासाठीच तर स्वतःची भूक आणि तहान हरू लागलो

पण काय झालं, बहुतेक कोणाची तरी नजर लागली अचानक
ती आता नसणार माझ्यासोबत हा धक्का आहे किती भयानक

आता सोडून गेली ती मला, कायमचच सोडलं तिनं माझं बोट
अरे भलताच विचार करू नका, ती होती माझी हजाराची नोट :laugh: :laugh: :laugh:

शब्दरचना : एम. सर्वज्ञ
M Sarvadnya