माझ्या गावाकडची वाट.

Started by Dnyaneshwar Musale, December 11, 2016, 04:39:23 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale


गर्द झाडीत लपलेली ती वाट
तिच्या आठवणी सतराशे साठ

कधी नवख्याला दाखवते पुष्पहारांच्या माळा
कधी तापलेल्या उन्हात कोणाला  गर्द छायेचा लळा

कधी नव्या नवराईला मोकळा एकांत
कधी सकाळी नातवंडना सोबत आजी आजोबांना मिळणारा सुखांत.

त्याच वाटेने जाते ती एस टी गाडी
तीच वाट दुरून दर्शवते माझी इवलीशी वाडी.

त्याच वाटेवर सासुरवाशीण डोळा लावुन असते बसुन
कुणी बालपण उजळुन जातं  दिवाळी नेसुन.

कोणासाठी असतो  घरासारखा वाटेवर वहिवाट.
तर कोणासाठी आठवण उरते  फिरवता पाठ

बऱ्याच जणांच सुख दुःख पाहिलं आहे तिने
एका ऋतु नंतर दुसरा ऋतु फुलताना पाहिला आहे तिने.

कधी चिखलातुन तर कधी मुलायम बनुन नेते
आठवण राहावी म्हणुन तीच धुळ खात राहते,

पण मी ही तुझ्या बऱ्याच आठवणी आता विसरत चाललोय,
आता वाटेचा रस्ता होताना मी तुलाही  पाहिलंय.

मात्र तुझं माझं नातं वाटेवरच राहिलंय
कारण क्रेडिट घेऊन आठवणीचही डांबरी करण झालंय.