याच साठी केला होता अट्टहास.......

Started by archana sawant, January 10, 2010, 12:06:17 PM

Previous topic - Next topic

archana sawant

याच साठी केला होता अट्टहास.......

जून १९७९....
कॉलेज चे दिवस होते ते.....तालुक्यातल्या एकमेव  अशा वाणिज्य आणि कला महाविद्यालयात मी B.CΟΜ शिकत होतो....तसा मी बिलंदर  होतो..... माझ्या गाडीच्या कॅरेज ला चित्र  काढायची वही आणि रंगाच्या बाटल्या नेहमी असायच्या.... मनात येईल तिथे बसून, समोर दिसणाऱ्याचे चित्र  तास-तास भर बसून रेखाटायची माझी सवय काही सुटत नव्हती....पोर मला " रंग्या" म्हणायची.....
गावातल्या सप्ताहात पांडुरंगाच्या देवळात बसून भजनं  म्हणताना  मी  माझा आवाज हि पारखून घ्यायचो....

कालचीच तर गोष्ट आहे असा वाटत ना....

कॉलेज च्या बाहेर धुल्भारल्या पांदीच्या वाटेवर मी वेळ साधून बसलो होतो.... वाट बघत....पावसाला सुरु होणार होता, गारवा वाढत चालला होता, शेजारच्या रानातून पेरणीची लगबग सुरु होती.आभाळ भरून आलं होता...
रोज याच वेळेला येणाऱ्या बैलगाडी कडे  माझं लक्ष होतं... घुन्गुर्वाली ती बैलगाडी रोज याच तर रस्त्यांना येत होती....
तीच पांढरी शुभ्र  खिलारी बैल जोड... मुंडासा बांधलेला तो राकट गाडीवान....आणि त्याच्या  शेजारी  हिरवं गार लुगड   नेसून बसलेली त्याची ती बायको....अंगभर लपेटून घेतलेला आणि डोक्यावर असलेला तिचा पदर, तिच्यातले खानदानी पण अधोरेकीत करत होतं...आणि तिच्या सौंदर्याला झळाळी देत होतां तिच्या माथ्यावारचा रुपयायेवढा कुंकवाचा टिळा....
याही पेक्षा माझं लक्ष वेधून घेतला ते त्याच्या मूक संवादानं...... गाडीत दोघेच असत, मी त्यांना कधीच बोलताना पहिला नाही....तो अधून मधून तिच्या कडे बघून हसायचा....आणि ती त्याच्य्कडे बघून मंद लाजायची.....
गाडीत बसल्यावर लागणाऱ्या हिंदोल्याने तिच्या हातातली काकणे खळ-खळत होती....त्याच्यातच घुंगरांचा आवाज मिसळत होतं.....किती दिवस हे मी पाहत होतो आज मला ते चित्रात बंदिस्त करायचा होतं.....मी झाडाखाली बसलो होतो...  आणि माझ्या हात माझ्या हात माझा आवडता  कुंचला होता. रंगांचा  खेळ मांडला, ती गाडी मला दिसली, क्षणभर मी तिला डोळे बघून बघितली....आणि कामाला लागलो....

किती वेळ गेला माहित नाही.....
चित्र बर्यापैकी   आकारात आला होतं.

" वाणिज्य महाविद्यालय हेच का?"  कोणीतरी विचारात होतं...
मी चमकून वर  पहिला आणि क्षणभर पहातच राहिलो, गोरा पान चेहरा, धारधार नाक, काळेभोर लांबसडक केस... आणि ती प्रश्नार्थक नजर.....आज हे लिहितानासुद्धा मला महिवर्ल्यागत होतंय.तेव्हा कळलं नाही..आजही कळत नाही... तुझ्या केसांचा रंग दाट होता का वर दाटून आलेल्या आभाळाचा कि मी ज्यात  फक्त खोल- खोल बुडतच गेलो त्या तुझ्या डोळ्यांचा.....
त्या दिवशी नक्की काय  झाला ते मला माहित नाही पन माझ्या मनात कुठेतरी लाल रंगच सांडला... त्या कपाळावरच्या  कुंकवासारखा...
'महादेव ' - आताचा  हा आवाज जबरी होतां, सरपंच रंगराव पाटलाना बघून मी खाडकन उठूनच उभा राहिलो.(आज रंगराव पाटलानी वाचवला नाहीतर हा 'रंग्या'  त्या दिवशीच तुझ्या डोळ्यात बुडून मेला असता....)

" ह्येच तुझं कालेज व्हय रं... ? मास्तर हैती का ? लई येळ झालाय... पाच वाजत आले ... "
' पाच वाजले ?" आता मी पुरताच भानावर आलो....
बघूया कि आहेत का ? - मी म्हणालो...
कॉलेजात आलो.... सरपंच बघून सारे सर, प्राचार्य हात जोडून उभेच राहिले....
' खुर्चीवर बसत सरपंच म्हणाले, ( माझा मन काही केल्या शांत बसतच नव्हतं.. जीवाचा धोका असूनही तुझ्या डोळ्यात बुडायला अधीर झालं होतं...) हि ' लक्ष्मी ', माझी पुतणी, हिच्या आवडत्या वर्गात हिला घाला ... शेवटच्या वाक्यात हुकुम होता.
माझं मन ' लक्ष्मी' ला चीटकून उभंच होतं..
माझ्या आबानं आणि आईन माझं नाव ठेवायला गडबड का बर केली असावी ???( ' महादेव-लक्ष्मी' , 'लक्ष्मी-महादेव' हे यमक जुळत नसल्याची खंत कुठेतरी वाटत  होती...)
' कोणत्या वर्गात जायचा आहे तुम्हाला ?' प्राचार्यांनी तिला विचारले....
" B.CΟΜ " च्या....
पांडुरंग... माझा हात एकदम  गळ्यातल्या माळे कडेच गेला..
१५  वर्ष पायी वारी केलेल्या माझ्या आई-बापाची म्हणा , सप्ताहात रात्रभर म्हणलेल्या भजनांची म्हणा , नाहीतर माझ्या मनात सांडलेल्या रंगाची म्हणा... आज पुण्याई फळाला आली होती......
झालं.. सरपंचाच्या पुतणीचा अडमिशन  झालं... ( आजच्या सारखी  तेव्हा ना मेरीट लिस्ट होती ना INTERVIEW...)
सरपंच बाहेर आले...' लक्ष्मी '- हा महादेव आपल्या गावातलाच आहे, मळ्यात राहतो, ( लक्ष्मीनं  माझ्याकडं बघीतलं ( असावं), सरपंच शेजारी असल्यानं मी मात्र बघीतलं नाही.... (खोटं  बोलत नाही तेवढा धीरच  झाला नाही...)
" हा चित्र छान काढतो, भजन हि सुरेख गातो...चांगला पोरगा आहे.... सरपंचानी मला सांगण्या सारखं काही ठेवलंच नाही..

शेवटचं वाक्य मात्र मला आवडल ...


पुढे चालू...






santoshi.world

पुढे काय आहे? उत्सुकता वाढली माझी आता पुढचं वाचायची :) ...