उर्मिला ...

Started by Kumar Sanjay, December 12, 2016, 04:18:21 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

प्रिय ती लक्ष्मणाची उर्मिला
एंकाकी अन् विरह सोबतीला
तव नयनाची गंगा झाली
पाहुनिया वाट राजवाड्याला

राजकन्या जरी एक
महादु:खे अपार सोसले
ध्येयशील ती भार्या
पतीस बळ दिले

वेदनेला सुर बनविले
गीताना चिंतन
प्राणनाथाच्या प्रतिश्रेत
प्रीतविरह प्राजक्त वेचले

सुने - सुने राजपथ
कुणी न दिसे उर्मिलाला
क्षण-क्षणाचे विष प्याले
एक- एक कालखंड पूर्ण झाला ....

कुमार संजय
7709826774